कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

ओळख

Homeनियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना  १ मे १९५७ रोज़ी झाली व १ एप्रिल १९५९ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. दिनांक १० जानेवारी २००८ रोज़ी प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या नावाने प्रादेशिक बाजार समिती म्हणून घोषित करण्यात आली आणि दिनांक ३० जानेवारी २००८ पासून कामकाजास सुरवात झाली.पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे दिनांक १० मे २०१२ रोजी विभाजन होऊन पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे असे घोषित करण्यात आले व त्याचा प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ दिनांक ११ मे २०१२ रोजी झाला.  पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे चा ,मुख्य बाजार आवार हा मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ३७ येथे १९० एकर जागेवर व्यापलेला आहे. पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्‍यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्‍यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे.