शेतीमालातील भेसळ तपासणीसाठी प्रयोगशाळाबाजार आवारात येणारा शेतीमाल भेसळमुक्त्त असावा या अनुषंगाने शेतीमालाची तपासणी करण्यासाठी राज्यात पहिलीच प्रयोगशाळा, पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेने सुरू केली आहे. या प्रयोगशाळेत खालील शेतीमालाची तपासणी केली जाते. याकामी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. मिरची पावडर, हळद पावडर, तेल, तुप, आटा, मैदा, साबूदाणा, धना पावडर,चहा पावडर या शेतीमालांचे दररोज नमुने बाजार आवारातून घेतले जातात व त्या नमुन्यांची तपासणी केली जाते. सदर तपासणी अहवाल सकारात्मक (Positive) आढळून आल्यास, अन्न व भेसळ कायदा व महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ मधील तरतूदी नुसार पुढील कारवाई केली जाते.
|
मुख्यपान | संस्थेविषयी | विशेष उपक्रम | बाजारभावाविषयी माहिती | समन्वय | बातम्या आणि पत्रे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे © २००९. |