कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

शेतकरी ते थेट ग्राहक शेतीमाल विक्री व्यवस्था

Homeशासन निर्णयानुसार वाढत्या महागाईला आळा घालण्याकारिता शेतकर्‍यांच्या शेतीमालास योग्य  तो बाजारभाव मिळावा व शेतकर्‍यांचा १०० टक्के फ़ायदा होउन ग्राहकाला रास्त बाजारभावात शेतीमाल उपलब्ध व्हावा याकरिता मध्यस्थाशिवाय शेतकरी ते थेट ग्राहक शेतमालाची विक्री व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील १७० शेतकर्‍यांच्या  गटास त्यांचा उत्पादित शेतीमाल थेट पद्धतीने फळे भाजीपाला विभाग, गुलटेकडी, मार्केटयार्ड येथे दिनांक १३/९/२००९ पासून विक्री व्यवस्था सुरू केलेली आहे. त्यास सर्वसामान्य ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी १ मे.टन एवढा शेतीमाल या विक्री केंद्रातून विक्री होतो.

शेतकरी ते थेट ग्राहक शेतीमाल विक्री व्यवस्थेअंतर्गतच ग्राहकाला रास्त दराने भाजी घरपोच मिळावी या अनुषंगाने "डायल फॉर भाजी" हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये ग्राहकांनी त्यांना आवश्यक असलेल्या भाज्यांबाबतची मागणी ही मोबाईल नं ९५५२५२८१८० व ९५५२५२८१९० यावरुन तसेच kvm.kalewadi@gmail.com या ईमेल वर नोंदविली जाते. व मागणी प्रमाणे ताजी, स्वच्छ व रास्त दरातील भाजी प्रत्येक सोमवार व गुरुवार सकाळी ७ ते १० या वेळेत संबधित ग्राहकास घरपोच केली जाते. सद्यस्थितीत ही सेवा गंगाधाम सह.गृहनिर्माण संस्था (बिबवेवाडी ,कोंढवा रोड) व रम्यनगरी सह.गृहनिर्माण संस्था (बिबवेवाडी) या दोन गृहनिर्माण सह.संस्था मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली असून यांची व्याप्ति लवकरच वाढविण्यात येत आहे.