कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

पार्श्वेभुमी (इतिहास)

भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था पुरवत शेतिमालउत्पादनावर अवलंबुन आहे. जवळ जवळ ७०% लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजीविका करत आहेत. शेतकार्‍यानेपिकवलेल्या शेतिमलाचि विक्री शेतकरी स्वाताच्या इच्छे प्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्येस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने, गुप्त रीतीने मालाची विक्री होत होती. मालाचे वजन व्यापर्यांची मापादी करीत होते. त्यामध्ये फसवणूक घट-तूट इत्यादी गैर प्रकार होत होते. धार्मदाय व इतर दृष्ट रूढी बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हाताश् होऊन हे सर्वे निपुनपणे सहन करीत होता. यातून शेतकर्याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियम करण्याची आवश्यकता भासु लागली.
भारतामधील पहिली बाजार समिती सण १८८६ साली करन्जलद येथे स्थापन झाली ही बाजार समिती कापुस खरेदी - विक्रीची नियमनसाठी स्थापन झाली.
रॉयल कमिशन ओन् अग्रिकल्चर या अभ्यास गटाने सन १८८६ साली जो अहवाल सदर केला त्यात शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यापर्यांकडून  होणारी फसवणूक थांबवणे. शेतिमाल विपनन व्य्वस्थेमधे असणार्‍या अनिष्ट प्रथा माडून काढणे व त्यांचा माल विकनेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी केन्द्र शासनाने राज्ये शासनाला कृषि उत्पन्नाच्या खरेदी -विक्री  विषयक कायदा तयार करण्याच्या सूचना दिल्या व त्यानुसार मुंबई कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) कायदा सन १९३९ हा अस्तित्वात आला.
सन १९३९ चे कायद्यात काही बदल करून १९६३ मध्ये महाराष्ट्रा कृषि उत्पन्न पनन (विनियमन) अधीनियम १९६३ कायदा मंजूर करण्यात आला व या कायद्यातील नियम १९६७ साली तयार करण्यात आले. त्यांनंतर १९८७ मधे नवीन तरतुदी अमलात आल्या.

स्थापना :-

मुंबई कृषि उत्पन्न खरदि-विक्री (नियमन) कायदा १९३९ नुसार कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना १ मे १९५७ रोजी झाली. प्रतेक्श कामकाजात प्रारंभ ९ एप्रिल १९५९ रोजी झाली.  बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्रा कृषि उत्पन्न पनन (विनियमन) अधीनियम १९३६ च्या कायद्यानुसार चालते.

समितीचे कार्यक्षेत्र:-

समितीचे कार्यक्षेत्र हवेली तालुका व पुणे शहर असे असून कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे ही १० जानेवारी २००८ रोजी पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे असे घोषित करण्यात आले व  त्यांच्या प्रतेक्ष कामकाजास प्रारंभ ३० जानेवारी २००८ रोजी झाला.
बाजार समितीचे गुळटेकाडी येथे श्री क्षत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे मुख्य बाजार असून हडपसर, मंगळवार पेठ, खडकी, पिंपरी-चिंचवड व उत्तम नगर येथे उप बाजार आहेत. या व्यक्तिरीक्त मोषी व  मांजरी येथे उप बाजाराचे काम अंतिम टप्प्यावर आहे.

उद्देश:-

१) बाजार पेठेतील चालणार्‍या अनिष्ठ प्रथा बंद करून शेत कार्यांचे आर्थिक हित संरक्षण करणे.
२) हत्ता पद्धतीवर बंधन घालून उघड लिलावि पद्धतीने मालाची विक्री करणे.
३) बाजार आवरात विक्रीस आलेल्या शेतिमालाचे चोख वजन मात्र देणे.
४) शेतिमाल विक्रीस २४ तासात शेतकर्यांना पैसे मिळवून देणे.
५) विवादांची निनामूल्ये तडजोड केली जाते.

मुखया बाजार आवार व उप बाजार:-

अ) श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड हे १९० एकर विस्तीर्ण सर्वे सुविधानी युक्त असे बाजार आवार आहे.
१) गुळ भुसार विभाग          १२५ एकर
२) फळे-भाजीपाला - कांदा बटाटा विभाग    २५ एकर
३) केळी बाजार       ५ एकर
४) पान बाजार  १ एकर
५) फुलांचा बाजार   २० गुन्थे
६) जानावरांचा बाजार    ३  एकर

मुखे बाजार आवारात प्रत्येक विभाग स्वतंत्र केला असून प्रत्येक विभागात विभाग प्रमुख व कर्मच्हयारयांची नेमणूक करण्यात आले आहे.

शेतिमालाच्या पूर्ण गाड्यांचे वजन करण्यासाठी शहरात जावे लागू नये म्हणून ५० टनि व २० टनि असे वजन काटे बसवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे शेतिमाल घेऊन येणार्‍या गाड्यांना  मार्केटयार्डवर पेट्रोल-डीझेल उपलब्ध ह्वावे या करिता पेट्रोल पंप उभारण्यात आला आहे.

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप बाजार पुढील प्रमाणे आहेत.

१) हडपसर मार्केट :-
१) सन १९७९ मध्ये ह्या बाजाराची सुरवात झाली आहे.
२) येथे अडत्या (मध्यस्थ दलाल) नाही. शेतकरी व ग्राहक थेट विक्री पद्धतीमुळे उत्पादाकांना स्वत:चे शेतिमाल बाजार भाव ठरवीता येतो.
३) शेतिमाल विक्री होताच रोख रक्कम दिली जाते.
४) बाजाराची वेळ दुपारी १२ ते ५ अशी आहे.
५) बाजार समिती मार्फत वजन काटे पुर्विले असून वजन हिशोबपत्ती बाजार समिती मार्फत करून दिली जातात.
२) पिंपरी-चिंचवड भुसार भाजीपाला बाजार:-
भाजीपाला बाजार १९७७ मध्ये व भुसार २००१ मध्ये सुरू झाला.
पिंपरी:-
१) मध्यस्थ नाही शेतकरी-ग्राहक थेट विक्री
२) उत्पादाकांना स्वस्त : शेतिमालाच्या भाव ठरवण्याचा अधिकार
३) वेळ पहाटे ५ ते सायांकाली ५
चिंचवड:-
१) शेतिमाल विक्री अडत्यानं मार्फत केली जाते
२) येथे एकूण ५ आडते आहेत.
३) वेळ सकाळी ७ ते २ आहे.
३ खडकी भाजीपाला बाजार:-
खडकी भाजीपाला सन १९७७ मध्ये गुळ व भुसार १९९० मध्ये सुरू झाला.
१) आडते असून भाजिपल्याची लिलाव पद्धतीने विक्री होते.
२) सकाळी ७ वाजता बाजार सुरू होतो.
४ उत्तमनगरभाजीपाला बाजार:-
१) सन २००१ मध्ये सुरू झाला.
२) मद्ध्यस्थी नाही थेट विक्री
३) वेळ ७ वाजता सुरू होतो.
५) मंगळ्वार पेठ कडबा बाजार:-
१) सन १९७२ मध्ये सुरू झाला
२) मालाची विक्री उघड करार पद्धतीने होते.
३) वजन माप संख्येच्या लिपीका मार्फत भुई कट्यावर होते.
६) नियोजीत उप बाजार मांजरी व मोषी :-
१ मांजरी :-
१) २.१८ हेक्टर जागा आहे.
२) शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होणार आहे.
३) सहा ओक्षण हॉल
४) दोन पशासकीय इमारती
५) पूरक व्यवसाय गाळे ४०
२ मोशी:-
१) ८.९९ हेक्टर जागा आहे.
२) तीन सेल हॉल
३) गुळ-भुसार साठी ४२ भुखंड
४) एक प्रशासकीय इमारत

बाजार समितीने पुरवलेल्या सुविधा:-

१) रस्ते, २४ तास पाणी, वीज, सुरक्षा, सॉफ सफाई ई. प्राथमिक सोई सुविधा उपलब्ध
२) शेतिमाल विक्री करिता गाळे व भुखंड ९९ वर्षाच्या भाडे पत्त्याने दिले आहेत.
३) वखार महामंडळ, शीतगृह, (मॅफ्कॉ) राष्ट्रीयकृत बँका, अर्बन , सहकारी व सर्व प्रकारच्या बँका पतसंस्था आणि सहकारी संस्थांना प्राधान्य व्यवसायास जागा
४) शेतकर्यांना निवासासाठी भव्ये शेतकरी निवासाची उभारणी करून नाममात्र ५/- रुपयांना मध्ये आंघोळिसाठी गरम पाण्यासह निवासाची व्यवस्था केली जाते.
५) शेतिमलाचे बाजार भाव रोजचे रोज वर्तमानपत्र, आकाशवार्ता, इंटरनेटवर देऊन प्रसिद्ध केले जातात.
६) बाजारा आवारास चारही बाजूने भिंतीचे बांधकाम केले असून शेतिमालाच्या सुरक्षतेसाठी सिकुरीटी नेमली आहे.
७) शेतीसाठी लागणारी अवजारे, बी-बीयाने-खत बाजारपेठेत उपलब्ध व्हावेत यासाठी दुकानना जागा देण्यात आली आहे.
८) पाण्याचा साठा होऊ नये म्हणून ड्रेनज व पावसाळी लाईन करण्यात आली आहे.
९) वीज पुरवठा खंडित झालेवर व्यवहार ठप्प होऊ नये व चोर्‍या होऊ नये याकरिता जेनरेटर बसवण्यात आले आहेत.